२०० मधमाशी पेट्या पडून; शेतकऱ्यांचा सवाल – मध कुठे?

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर
Ramtek Hivra Bazar शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार येथे राबविण्यात आलेल्या मधमाशी पालन प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २२ जानेवारी रोजी २०० मधमाशी पेट्या व वसाहती केंद्रावर आल्या; मात्र काही पेट्या ४५ दिवसांपर्यंत पडून राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पेट्या वितरित झाल्यानंतरही आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन मिळाले नसल्याची तक्रार आहे.प्रकल्पातील आर्थिक व्यवहार, प्रशिक्षणाचा कालावधी, मधमाशांच्या प्रजाती तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या वसाहतींच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. २० शेतकऱ्यांकडून १ लाख ३५ हजार रुपये जमा करण्यात आल्याचा, तर काही रकमेबाबत तफावत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
 
 
pravin
 
 
 
रेड स्वस्तिक सोसायटीचे संस्थापक डॉ. टी. एस. भाल यांनी या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडे तक्रार करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. प्रकल्पाच्या यशाचे मोजमाप केवळ पेट्या वाटपावर न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेल्या उत्पन्नावर व्हावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे २०० पेट्यांची प्रत्यक्ष स्थिती, उत्पादन, प्रशिक्षण व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र