नागपूर
Sanskar Bharati Nagpur कै. विमलताई पत्की यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कार भारती, नागपूरच्या वतीने सुप्रसिद्ध गायिका सुगंधा लातूरकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता पांडे लेआउट येथील स्व. दत्ताजी डिडोळकर भवनातील संस्कार भारती सभागृहात कार्यक्रम होईल.
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे माजी संचालक डॉ. दीपक खिरवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तबल्याची साथ राम ढोक, तर हार्मोनियमची साथ नरेंद्र कडवे करणार आहेत. संगीतप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विरेन चांडक आणि मंत्री मुकुल मुळे यांनी केले आहे.
सौजन्य:गजानन रानडे ,संपर्क मित्र