मूकबधिर विद्यालयात प्रकृतिवंदन

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नागपूर,
School for the Deaf पर्यावरण संवर्धन व संरक्षण समिती, शंकरनगर नागरिक सांस्कृतिक मंडळ आणि मूकबधिर विद्यालय, शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकृतिवंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पावसामुळे कार्यक्रम शाळेच्या सभागृहात घेण्यात आला.
 

mhesh 
 
 
यावेळी मान्यवर व विद्यार्थ्यांनी भारतमातेची प्रतिमा, कुंडीतील वृक्ष व जलपात्राचे पूजन करून पुष्पार्चन केले. पर्यावरण गतिविधीचे संयोजक व मंडळाचे अध्यक्ष संजय पत्की यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्त्या डॉ. अमिता पत्की यांनी प्रकृतिवंदनाचे महत्त्व सांगितले. प्राचार्या द्रौपदी चव्हाण यांनी संस्थेची माहिती दिली. सरिता पटवर्धन यांनी भाषणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली. सूत्रसंचालन निरंजन कायंदे यांनी केले, तर ॲड. मंगदे यांनी आभार मानले. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:महेश मोळकर,संपर्क मित्र