वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर,
tiger attack मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 154 मध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. विजय मधुकर मेश्राम (25, रा. जुनोना) असे मृतक गुराख्याचे नाव आहे.
 

tiger attack kills cattle herder in chandrapur 
या घटनेची माहिती प्राप्त होताच मोहर्ली (प्रादे.) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेगावकर व त्यांची टीम तसेच मानद-वन्यजीव रक्षक व क्षेत्रीय वनकर्मचारी मुकेश भांदककर हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत इसमाची आई निरंजना मधुकर मेश्राम यांना मौक्यावर तात्काळ मदत स्वरूपात 50 हजार रुपये देण्यात आले. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून, जुनोना येथील गावकर्‍यांना सतर्क राहून कामे करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास माहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.