वर्धा,
guru-purnima : स्वरदायिनी गायन क्लासेच्या संचालक केतकी कुलकर्णी आणि स्वरनाद तबला क्लासचे संचालक मंगेश परसोडकर यांच्या संकल्पनेतून दोन्ही क्लासेसचे एकत्रित रित्या गुरुपूजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मधूसुदन दीक्षित यांची उपस्थिती होती.
यावेळी दीक्षित यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. सादरीकरण सत्रात विद्याथ्र्यांनी मंगला देशमुख यांच्या मंगल स्वरांजली या पुस्तकातील देश बागेश्री तसेच दरबारी कानडा रागांवर आधारित बंदिशी सरगम, तराणा तसेच काही पारंपारिक बंदिशी सादर केल्या. तबल्याच्या विद्याथ्र्यांनी त्रिताल कायदा व शिवतांडव स्तोत्रावर तबला कवर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संचालन सुजाता भालशंकर तसेच जान्हवी वंजारी यांनी केले. आभार केतकी कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रमाला मंगला देशमुख, श्याम सरोदे, सूरमणी वसंत जळीत, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष माधव पंडित, मंत्री मकरंद उमाळकर, श्रीधर देशमुख व अनिल पाखोडे उपस्थित होते.