तस्लिमा नसरीनला अभिजीत दीपके यांचे प्रत्युत्तर; आमच आंदोलन वेगळ

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Abhijit's reply to Taslima Nasrin जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या आंदोलनाची तुलना बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाशी केल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपक यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमचे आंदोलन पूर्णपणे वेगळे असून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वृत्तानुसार, सोमवारी अभिजीत दीपक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सीजेपीची जबाबदारी आता अधिक वाढल्याचे सांगितले. देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पक्षाच्या माध्यमातून नेतृत्व दिले जाईल आणि लवकरच संघटनेचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने अद्याप १ कोटी रुपयांची मदत दिलेली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. आंदोलनादरम्यानही हीच मागणी करण्यात आली होती.
 
 
 
 
do[te
दरम्यान, तस्लिमा नसरीन यांनी सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ दिला. सुरुवातीला ते आंदोलन आरक्षण व्यवस्थेविरोधात असल्याचे वाटले, त्यानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या. मात्र पुढे त्या आंदोलनामागे जिहादी शक्ती असल्याचे समोर आले आणि त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याचा दावा त्यांनी केला. अशा प्रकारचे आंदोलन योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.या टीकेला उत्तर देताना अभिजीत दीपक यांनी आंदोलन बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत, असे सांगताना त्यांनी जंतर-मंतर परिसरात बाहेरून काही गुंड पाठवण्यात आल्याचा दावा केला. सरन्यायाधीशांची बदनामी करण्यासाठी हा डाव आखण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
 
 
याशिवाय दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जंतर-मंतर परिसरात स्वतःला तपासणीनंतरच प्रवेश देण्यात आला, मग इतर संशयितांना प्रवेश कसा मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. १९ तारखेच्या रात्री आंदोलनस्थळाच्या मागे दगडांनी भरलेला ट्रक आणि तुटलेली व्हॅन आधीच उभी करण्यात आली होती, असा आरोप करत हे सर्व पूर्वनियोजित असल्याचा दावाही त्यांनी केला.दरम्यान, अभिजीत दीपक आणि तस्लिमा नसरीन यांनी केलेले हे दावे आणि आरोप स्वतंत्रपणे पडताळले गेलेले नाहीत. संबंधित प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू आहे.