मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते अतिक्रमकांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे वितरण

शेकडो कुटुंबांना हक्काच्या घराचा कायदेशीर आधार

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
ashok-uike : शहरातील तहसील कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर पंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमक लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे (नियमितीकरण आदेश) वितरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून आपल्या निवासस्थानाला कायदेशीर मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करणाèया कुटुंबांसाठी हा दिवस आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरला.
 
 

y3Aug-Ashok 
 
 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावी धोरणातून 1 जानेवारी 2011 पूर्वीचे गावठाण क्षेत्रातील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत राळेगाव नगर पंचायत हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण आदेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करताना सांगितले की, शासन सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावून हजारो कुटुंबांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. स्वतःच्या घराला कायदेशीर ओळख मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहèयावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
 
 
कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी शासनाप्रती आभार व्यक्त करत, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. पट्ट्यांच्या वितरणामुळे अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराला कायदेशीर संरक्षण मिळाल्याने त्यांच्या भविष्यासाठीही नवी आशा निर्माण झाली आहे.
 
 
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, नगर पंचायत मुख्याधिकारी गिरीश पारेकर, नगर पंचायत अध्यक्ष रवींद्र शेराम, नपं उपाध्यक्ष जानराव गिरी, माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.