तीन दिवसांत वेतन द्या, अन्यथा नगर परिषदेला घेराव

-ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार सेनेचा एल्गार -वेतन रखडणे हे कामगार कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
blue-bhim-tiger-temporary-workers-army : यवतमाळ नगर परिषदेत कार्यरत अस्थायी कर्मचाèयांचे थकीत वेतन तत्काळ अदा करावे, अन्यथा तीन दिवसांनंतर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार सेनेने दिला आहे. सोमवार, 3 ऑगस्ट 2026 रोजी संघटनेच्या पदाधिकाèयांनी नप मुख्याधिकाèयांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
 
 
 
y3Aug-Bhim-Tiger
 
 
 
संघटनेच्या निवेदनानुसार, 5 मे 2025 रोजी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आजतागायत सादर करण्यात आलेला नाही. तसेच संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अस्थायी कर्मचाèयांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
संघटनेने म्हटले आहे की, अनेक कर्मचाèयांचे वेतन दीर्घकाळापासून रखडल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वेतन देयक अधिनियम, 1936, तसेच वेतन संहिता, 2019 नुसार पात्र कर्मचाèयांना वेळेवर वेतन देणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. विनाकारण वेतन रखडविणे हे संबंधित कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन ठरू शकते.
 
 
संघटनेने प्रशासनाला तीन दिवसांची मुदत देत चौकशी अहवाल सार्वजनिक करावा व सर्व कर्मचाèयांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा नगर परिषदसमोर तीव्र आंदोलन, धरणे व लोकशाही मार्गाने संघर्ष छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाèया परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्याम बनसोड यांच्यासह नितीन भुसरेड्डी, संजय मेश्राम, सावन चौधरी, आदेश मेश्राम, प्रफुल मेश्राम, शिकेन काळे, शैलेंद्र देशपांडे, आकाश ओंकार, शेख हसन, अमजत खान उपस्थित होते.