जिल्ह्यातील १४ तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
वर्धा,
pankaj-bhoyer : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील १४ देवस्थाने, यात्रास्थळे व तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली.
 
 

j
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह खासदार अमर काळे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. अरुण लखानी, जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
 
 
क वर्गाचा दर्जा मिळालेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये शेडगाव (चौ.) येथील सद्गुुरू जगन्नाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, नालवाडी येथील संत नरहरी महाराज देवस्थान ट्रस्ट, इंझाळा येथील महादेव मंदिर देवस्थान सेवा समिती, तळेगाव (टा.) येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान, सावंगी (मेघे) येथील महादेव मंदिर, बोरगाव (मेघे) येथील आई तुळजाभवानी (सुपारी माता) मंदिर, शिरपूर येथील संत पैगाजी महाराज देवस्थान, आलोडी येथील स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार परिसर, दोडकी येथील विठ्ठल-रुख्माई मारुती देवस्थान, आलोडी अंजनामाता, महाकाळ येथील संत तुकडोजी महाराज देवस्थान संस्थान, आलोडी येथील पवनसुत हनुमान मंदिर सेवा मंडळ, म्हसाळा येथील संत जगन्नाथ महाराज मंदिर सेवा समिती तसेच नाचणगाव येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानांचा समावेश आहे.
 
या निर्णयामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांमध्ये मूलभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.