स्कूल व्हॅनला कारची धडक; १६ विद्यार्थी जखमी, ६ गंभीर

करंजी-काजी जवळील अपघात

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
car-collides-with-school-van : वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरात विद्याथ्र्यांना शाळेत घेऊन येणार्या स्कूल व्हॅनला भरधाव कारने धडक दिली. यात १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी ६ विद्याथ्र्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात कार व स्कूल व्हॅनचेही नुकसान झाले. ही घटना आज सोमवार ३ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वर्धा जाम मार्गावरील करंजी काझी येथे झाला.
 
 
 
car-collides-with-school-van
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, करंजी-काजी येथील चालक साठोणे हे नेहमीप्रमाणे मदनी, दिंदोडा आणि करंजी-काजी येथून विद्याथ्र्यांना घेऊन वर्धर्ेतील सुशील हिम्मतसिंगका विद्यालय आणि महिलाश्रम बुनियादी प्राथमिक विद्यालयात एम. एच. ३४ ए. बी. ८११४ क्रमांकाच्या स्कूलव्हॅनने १६ विद्यार्थी घेऊन येत होते. स्कूल व्हॅन करंजी काजी परिसरात आली असता वर्धेकडून मदनीच्या दिशेने जाणार्या एम. एच. ३२ ए. एस. ४९४० क्रमांकाच्या भरधाव कारने स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. धडक होताच स्कूल व्हॅन उलटली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत विद्याथ्र्यांना रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांची चमू ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात घटनास्थळी पोहोचली. शिवाय पंचनामा केला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
जखमी विद्याथ्र्यांमध्ये भूमिका नखाते, ओम नागतोडे, हार्दिक नैताम, जान्हवी तिखे, अथर्व चरडे, धनश्री चौधरी, पवन तिखे, चिराग कुबडे, अंशू नागतोडे, विधी सोनटक्के, जान्हवी सडमाके, युग तिमांडे, गुंजन उगेमुगे, आर्या बागडे आणि मीनाक्षी तिमांडे आणि व्हॅन चालक साठोने यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. ६ विद्याथ्र्यांची प्रकृती गंभीर तर उर्वरित विद्याथ्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे.