पतीसह सासरच्या कुटुंबियांकडून हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
harassment-of-a-married : माहेरुन हुंडा आणण्यासाठी दबाव टाकून एका विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दोन दीर अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
 
ngp
 
 
 
दुबेनगर येथील स्नेहा कुमार मालखेडे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह ४ फेब्रुवारी २०२४ रोजी कुमार रमेश मालखेडे याच्याशी झाला होता. विवाहासाठी माहेरच्यांनी सुमारे १२ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी हुंड्यासाठी टोमणे मारत पैशांची मागणी सुरू केली. याशिवाय अनेक आरोप स्नेहाने तक्रारीतून लावले आहे. ३१ जुलै २०२६ रोजी त्या पतीकडे गेल्या असता, पती कुमार मालखेडे याने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या भाऊ समरेश गिरी यालाही मारहाण करण्यात आली असून, त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी स्नेहाचा पती कुमार मालखेडे, सासू, सासरे दोन दिरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.