पोलिसांना गुंगारा देऊन पळालेला आरोपीला पुन्हा अटक

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
escaped-accused-re-arrested : गिट्टीखदान पोलिसांच्या तावडीतून एक कुख्यात आरोपी पळून गेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी रात्रभर त्या आरोपीचा शोध घेतला. अखेर पहाटेच्या सुमारास पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.
 

ngp 
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, ३१ जुलै रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालोद्यान, सिव्हिल लाईन्स येथे आरोपी शस्त्र घेऊन नागरिकांना अडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला घेराव घातला आणि त्याच्या हातातील लोखंडी चाकू जप्त केला. मनाई आदेशाचे उल्लंघन करून दहशत पसरवत असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
 
 
मात्र, गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, आरोपीने संधीचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. या घटनेमुळे पोलिस वतुर्ळात खळबळ उडाली. आरोपीच्या शोधासाठी शहरातील सर्व पोलिस ठाणी आणि गुन्हे शाखेची विविध पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या १८ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्याला पुन्हा ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल, एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.