कालव्याचे सिमेंटचे पोपडे निघाले...

संभाव्य अपघातासाठी पोषक स्थिती

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
पवनी,
gosekhurd project पावसाळ्यात नहर, कालवा फुटून नुकसान होण्याच्या घटना आपण ऐकतो. अशाच एका घटनेसाठी पोषक अशी स्थिती गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात निर्माण झाली आहे. पवनी येथील शिवाजीनगर परिसरातील जाणाऱ्या या कालव्याच्या पक्के बांधकाम फुटले असल्याने आतील मातीने कोण मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास प्रचंड नुकसान होऊ शकते.
 
 

gosekhurd project 
 
 
पावसाळ्यात कालवा, तलावाची पाळ फुटणे हे प्रकार होत असतात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच अशा नादुरुस्त कालव्याची डागडुजी करणे अपेक्षित असते. मात्र त्याकडे होणारे दुर्लक्ष बरेचदा मोठ्या विनाशासाठी कारणीभूत ठरते.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या शहराच्या शेजारून गेलेल्या उजव्या कालव्यालाही अशीच क्षती पोहोचली आहे. शिवाजीनगर परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून या कालव्या पाईप टाकून पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. याच ठिकाणी कालव्याचे सिमेंटचे पोपळे निघाले आहेत. सिमेंट निघाल्याने कालव्यातून जाणारे पाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे आतील माती खचू लागली आहे. ही माती अशीच खचत राहिल्यास कालव्याच्या पाळीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.gosekhurd project यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते. जवळपास एक ते दीड वर्षांपासून कालवा या ठिकाणी क्षतिग्रस्त झाला आहे. सूचना देऊनही संबंधित विभाग गंभीर नसल्याचे दिसत असून भविष्यात मोठा धोका झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल.