नाल्याच्या पुराचे पाणी घुसल्याने शेतातील फुलकोबी सडली

-अल्पभूधारक शेतकèयाचे प्रचंड नुकसान -सोईट (म) शिवारातील शेतकèयाची व्यथा

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
floodwaters-from-the-drain : जेमतेम अत्यल्प 2 एकर जमीन त्यात एक एकरमध्ये फुलकोबीचे पीक बहरले असताना मुसळधार पावसामुळे सोईट (म) शिवारातील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी पिकात घुसल्याने फुलकोबी सडून प्रचंड नुकसान झाल्याने ब्राम्हणगाव येथील शेतकरी बुधाजी बळीराम कुरूमवाड नैसर्गिक संकटापुढे हतबल झाले आहेत.
 
 
 
y3Aug-Fulkobi
 
 
 
बुधाजी कुरूमवाड यांची सोईट (म) शिवारात 2 एकर शेती असून हेच त्यांचे उपजिवीकेचे साधन आहे. त्यामुळे ते अधिक उत्पन्न मिळावे यासाठी एका एकरात फुलकोबी फळभाजी उत्पादन घेण्याचा प्रयोग राबवितात मात्र नुकत्याच झालेल्या संततधार पावसाने शेताजवळील नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण पीक सडून गेले त्यामुळे त्यांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला.
अल्पभूधारक शेतकèयावर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत असल्याने कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आहे.