तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
balasaheb-mangulkar : तालुक्यात 30 जुलैला झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने अनेक शेतकèयांच्या सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांच्या घरांची पडझड झाली. या भागाची आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पाहणी करून नुकसानाचे तत्काळ पंचनामे करावे, असे प्रशासनाला आदेश दिले आहेत.
शेतकèयांचे शेतीसाठी वापरले जाणारे स्प्रिंकलर सेट, ड्रिप सिंचन संच, इलेक्ट्रिक मोटार पंप, इलेक्ट्रिक वायर, पाईपलाइन व इतर शेती साहित्य यांचेही मोठे नुकसान झाले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात सुमारे 150 मिमी पावसाची नोंद झाली.
रुई,वाई,तिवसा सर्कलमधील बेलोरा गावाला भेट देत अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मांगुळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.
पाहणीदरम्यान त्यांनी महसूल, कृषी तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाèयांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. सोबतच पुरामुळे नुकसान झालेली घरे, शेती साहित्य, सिंचन व्यवस्था व इतर मालमत्तांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकèयांना कोणत्याही प्रकारच्या मदतीपासून वंचित ठेवू नये. तसेच प्रत्येक नुकसानग्रस्ताची नोंद करून शासनाच्या सर्व मदत योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वासुदेव गुघाने, तलाठी सतीश दुमाळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाèयांसह अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.