नागपूर,
Inner Wheel Club of Nagpur इनर व्हील क्लब ऑफ नागपूरतर्फे अध्यक्षा पूजा सावजी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय मैत्री दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पूजा सावजी यांनी इनर व्हीलची स्थापना मैत्री आणि समाजसेवेच्या मूल्यांवर झाल्याचे सांगत प्रत्येक सदस्याने ही भावना आपल्या कार्यातून जपावी, असे आवाहन केले
जनरल बॉडी मिटिंगनंतर (GBM) आयोजित कार्यक्रमात ४५ सदस्यांनी सहभाग घेत एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे बंध दृढ केले'मैत्री' विषयावरील काव्यपंक्ती सादरीकरण स्पर्धेत भारती पांडे यांनी प्रथम, ज्योत्स्ना बजारे यांनी द्वितीय, तर वंदना बारस्कर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्रतिभा कुलकर्णी आणि निता पुन्यानी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचा समारोप उपाध्यक्षा शर्मिला आनंद यांनी आभार प्रदर्शनाने केला.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र