‘महाराजस्व समाधान शिबिर’ हा जनसेवेचा उपक्रम : पालकमंत्री संजय राठोड

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
sanjay-rathod : ‘महाराजस्व समाधान शिबिरा’तून 7 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लाभांचे वितरण आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दारव्हा दिग्रस नेर परिसरातील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत येथील जाधव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले.
 

y3Aug-Samadhan 
 
या शिबिराच्या माध्यमातून महसूलसह 22 शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारून एकाच दिवशी सुमारे 7 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना शासकीय लाभांचे आणि उपकरणांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी खासदार संजय देशमुख, व्यसनमुक्ती प्रबोधनकार मधुकर खोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, दारव्हा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, दारव्हा नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, श्रीधर मोहोड, भाऊराव ढवळे, यशवंत पवार, संतोष चव्हाण, दत्ता रहाणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, महाराट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम आणून नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देणे अधिकाèयांवर बंधनकारक केले आहे. पूर्वीप्रमाणे सेवा देणे ही जबाबदारी होती, मात्र आता हा कायदा झाला आहे. आता सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांना निर्धारित वेळेत सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
 
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक ती कागदपत्रे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शेतकèयांना अडचणी येतील, त्यांच्यासाठी पालकमंत्री, खासदार आणि लोकप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेऊन अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी लवकरच विशेष कार्यक्रम, शिबिरे घेऊन अडचणी दूर केल्या जाईल. यासोबतच लाडकी बहीण योजनेतील वंचित राहिलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
 
 
यावेळी खा. संजय देशमुख यांनीही मार्गदर्शन करून उपक्रमाचे कौतुक करून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच जिप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले.
कालबद्ध कार्यवाहीचे निर्देश
 
 
शिबिरात निकाली न निघालेल्या सर्व अर्जांवर आणि निवेदनांवर येत्या 8 ते 10 दिवसांच्या आत कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाèयांना दिले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले.