मृत्युंजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून मोहेगाव येथील विद्यार्थ्यांना एस.टी. बसची सुविधा

*विद्यार्थ्यांची समस्या तातडीने मार्गी

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
mrutyunjay-gaikwad : मोहेगाव येथील शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते तथा युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोहेगाव येथील विद्यार्थ्यांना लवकरच नियमित एस.टी. बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या या तत्पर निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
k
 
 
दि. ३ ऑगस्ट रोजी बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात मोहेगाव येथील शिवाजी हायस्कूल, एडेड हायस्कूल तसेच इतर शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवासाच्या समस्येसंदर्भात आ. संजय गायकवाड यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात धाव घेतली. आ. गायकवाड हे दौर्‍यावर असल्याने विद्यार्थ्यांनी युवानेते मृत्युंजय गायकवाड यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सविस्तरपणे मांडल्या. विद्यार्थ्यांनी सांगितले की, मोहेगाव ते बुलढाणा या मार्गावर नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने शाळेत वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. अनेक वेळा बस उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकताच युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी कोणताही विलंब न करता तातडीने एस.टी. आगर व्यवस्थापक पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होता कामा नये. त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार मोहेगाव मार्गावर नियमित बसची व्यवस्था करण्यात यावी.
 
 
युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत आगर व्यवस्थापक पवार यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत उद्यापासून या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी युवानेते मृत्युंजय गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी जीवन उबरहंडे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, प्रदीप जैन, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.