अमरावतीच्या मुख्य बाजारपेठेत हत्या

तीन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
अमरावती
murder-in-amravati शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बापट चौकात रविवारी रात्री साडेअकरा वाजता एका युवकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

amravati murder 
 
 
शरीफ बेग रशीद बेग (वय ३१, रा. लालखडी) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तिघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. अहमद बेग रशीद बेग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले.
 
ते पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा ताब्यात घेतले. शेख रेहान शेख हारुण (रा. सुफियाननगर), शेख नुरेन शेख इरफान (रा. सबानगर), इरफान खान उर्फ गोलू जावेद खान (रा. अकबरनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दारू पिण्याच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे.