अवयवदान हेच श्रेष्ठ दान : निंबोरकर

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
गडचिरोली,
pranoti-nimborkar : अवयवदान म्हणजे मृत्यूनंतर किंवा काही परिस्थितीत जिवंत असताना स्वतःचे अवयव गरजू रुग्णांना दान करणे होय. हे दान केवळ एका व्यक्तीचेच नव्हे, तर अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकते. त्यामुळे ‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’ असल्याचे नगराध्यक्षा ड. प्रणोती निंबोरकर यांनी सांगितले.
 
 
j
 
 
 
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय यांच्या वतीने अवयवदान पंधरवडा 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या अभियानाच्या शुभारंभानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
 
 
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. छाया उईके, भीषक तज्ञ डॉ. मनीष मेश्राम, आशा बावणे, फेबूलवार सिस्टर, रोटरी क्लब अध्यक्ष मदत जीवाणी तसेच विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.