एक झाड आईच्या नावाने' अभियानात २०० रोपांचे वृक्षारोपण

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Planting of 200 saplingsनागपूर : वनमहोत्सवानिमित्त संजीवन आश्रम परिसरात "एक झाड आईच्या नावाने" अभियानांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संजीवन सोशल-मेडिकल फाउंडेशनसह सहा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभियानाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच अधिकाधिक नागरिकांना वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित करणे हा होता.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेस क्लब, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
 
 

dbli 
 
 
  
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. मिश्रा यांनी आपल्या भाषणात केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. प्रवीण डबली यांनी संपर्क व संवादच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ऐतिहासिक आणि सार्वजनिक विहिरींचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संधारण (वॉटर हार्वेस्टिंग) स्वीकारणे तसेच आपल्या घर, परिसर आणि कार्यस्थळी अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन केले.
.
 
या प्रसंगी मनोज खडसे, मंजिरी साने (फार्मा आरंभ ग्रुप),, धर्मेंद्र जोरे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट), मानकर यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.अभियानाची सुरुवात डॉ. राजू मिश्रा यांच्या हस्ते पहिले रोप लावून करण्यात आली. त्यानंतर १०७ मान्यवर नागरिक आणि स्वयंसेवकांनी नक्षत्रवृक्ष, फळझाडे तसेच औषधी वनस्पतींसह एकूण २०० रोपांचे वृक्षारोपण केले आणि त्यांच्या संगोपनाचा संकल्प केला.कार्यक्रमात वसंत पारधी, जितेश दवे, दिलीप धवले, नारायण गंधारे, प्रेम बिरादर आणि सौरभ सिंह उपस्थित होते. तसेच फार्मा आरंभ संस्थेचे किरण देशमुख, गायत्री परिवाराचे शशिभूषण अग्रवाल, सी. एम. झाडे फाउंडेशनच्या भारती झाडे व विकास झाडे, डॉ. समीर चौबे, डॉ. स्मिता चौबे, प्रेस क्लबचे सनी शेंडे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवक यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय उगेमुगे यांनी केले, तर श्री नाना ढगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाना ढगे, शेखर सावरकर तसेच संजीवन निसर्गोपचार केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या चमूने मोलाचे योगदान दिले.
सौजन्य :डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र