प्रगती गार्डन ज्येष्ठ नागरिक मंडळात मैत्री दिन उत्साहात

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Pragati Garden Citizens' Association दिघोरी येथील प्रगती गार्डन ज्येष्ठ नागरिक मंडळात मैत्री दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 
 
dp2
 
 
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य शामराव लांजेवार यांचा वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश धनजोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर भगत व सचिव डॉ. दीपक शेंडेकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रमोद अंजणकर यांनी केले, तर आभार रामचंद्रजी बोडके यांनी मानले. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र