तभा वृत्तसेवा
राळेगाव,
consumer-panchayats : नागरिकांच्या सार्वननिक समस्यांबाबत विविध विभागांना निवेदन देऊन ग्राहक पंचायत राळेगाव शाखेने योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
ग्राहक पंचायत मार्फत तालुक्यातील शाळेजवळील दुकानातून फास्ट व इन्स्टंट फुडच्या पाकिटाची विक्री थांबण्यासाठी. तसेच विद्यार्थी, पालक व विक्रेते यांना बालकांच्या प्रकृतीवर होणाèया अपायाबद्दल माहिती देऊन खाण्यास व विक्रीस प्रतिबंध करण्याबाबत गटशिक्षण अधिकारी नवनाथ लहाने यांना निवेदन देण्यात आले.
बसस्थानकावर केवळ राळेगाव डेपोतून जाणाèया व येणाèया बसेसचे वेळापत्रक लावले आहे. येथे इतर बस डेपोतून येणाèया, जाणाèया बसेसचे परिपूर्ण वेळापत्रक लावण्यात यावे, असे निवेदन आगारप्रमुख सुमित टिपले यांना देण्यात आले.
एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक छत असलेल्या इमारतींवर जल पुरर्भरण करण्याबाबत शासकीय, सहकारी, शैक्षणिक, खासगी उद्योजक व नागरिकांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्लास्टिक पन्नीमुळे होणारे प्रदूषण रोखण्याकरता घराघरात प्लास्टिकच्या पाण्याच्या खाली लहान-मोठ्या बॉटलमध्ये प्लास्टिक पन्नी संकलित केल्यानंतर गोळा करण्याची वेगळी व्यवस्था करण्याबाबतचे नगरपंचायत मुख्याधिकारी गिरीश पारेकर व अध्यक्ष रवींद्र श्रीराम यांना निवेदन देण्यात आले.
बँकांनी वाहन पार्किंगची वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी, याकरिता स्टेट बँक, ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, यवतमाळ व पुसद अर्बन बँक व्यवस्थापकांना निवेदने देण्यात आली.
यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष प्रा. मोहन देशमुख, उपाध्यक्ष विनय मुणोत, सहसचिव हेमंत निंबुळकर, कोषाध्यक्ष भूपेंद्र कारिया, सदस्य सुरेंद्र ताठे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वर्मा उपस्थित होते.