रामनगर राममंदिरात महालक्ष्मीयाग विधिवत संपन्न

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Ramnagar Ram Mandir रामनगर येथील राममंदिरात ब्रह्मवृंदातर्फे महालक्ष्मीयाग भक्तिमय वातावरणात आणि वैदिक पद्धतीने संपन्न झाला. ब्रह्मवृंदाच्या सुस्पष्ट वेदोच्चारात झालेल्या यागामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
 

ydan 
 
 
यागासाठी सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. वेदमंत्रांच्या घोषात महालक्ष्मीचे पूजन, होमहवन व पूर्णाहुती करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून यागात सहभाग घेतला व देवी महालक्ष्मीच्या चरणी सुख-समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिर समिती, ब्रह्मवृंद तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:रवी वाघमारे,संपर्क मित्र