साधू मंदिरात सुरेल अभंगसंध्या

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Sadhu Mandir Mahal महाल येथील साधू मंदिरात आयोजित अभंगसंध्येच्या कार्यक्रमात वल्लभ मुठाळ आणि अमोघ देशपांडे या बालकलाकारांनी आपल्या सुरेल व भावपूर्ण अभंगगायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तिरस, संस्कार आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

sadhu
 
 
कुमार वल्लभ मुठाळ यांनी संतवाङ्मयातील अभंग सादर केले. तर कुमार अमोघ देशपांडे यांनी संतांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही बालगायकांनी केवळ अभंग गायले नाहीत, तर त्यांच्या शब्दांतील भक्तिभाव आणि अर्थही आपल्या स्वरांतून प्रभावीपणे पोहोचविला.संवादिनीवर शैलेश मुठाळ यांनी सुरेल साथ दिली, तर तबल्यावर स्वप्नील भोसले यांनी साथसंगत करून कार्यक्रमाची उंची वाढवली. रविंद्र साधू यांनी निवेदन केले.
सौजन्य:रवींद्र साधू ,संपर्क मित्र