दोन वर्षांनंतर प्रथमच जगासमोर येणार शेख हसीना!

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sheikh Hasina will deliver a speech. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर येणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्युअल कार्यक्रमात त्या सहभागी होणार असून, आपल्या राजकीय भवितव्याबाबत तसेच बांगलादेशात परतण्याच्या शक्यतेबाबत भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.'फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया'तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील मथुरा रोडवरील सर मार्क टली सभागृहात सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण क्लबच्या सोशल मीडिया माध्यमांवरही केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या सत्तेचा अंत होऊन दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी आरक्षण व्यवस्थेविरोधात सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने पुढे देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाचे रूप धारण केले.
 
 
 
साडी ६ ६ ७
 
आंदोलनादरम्यान हिंसाचार वाढल्यानंतर आणि आंदोलकांनी सरकारी इमारतींवर ताबा मिळवल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या जवळपास १६ वर्षांच्या सत्ताकाळाचा अंत झाला.भारतात आल्यानंतर शेख हसीना यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे पदच्युतीनंतरचे हे त्यांचे पहिले महत्त्वाचे सार्वजनिक भाषण ठरणार आहे. या कार्यक्रमात शेख हसीना यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि बांगलादेशचे माजी आयसीटी सल्लागार साजीब वाजेद जॉय, माजी शिक्षणमंत्री मोहिबुल हसन चौधरी नोफेल, बांगलादेश ह्युमन राइट्स वॉचचे महासचिव मोहम्मद अली सिद्दिकी, माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार शकीब अल हसन, माजी राजनयिक व सुरक्षा तज्ज्ञ अमीनुल हक पोलाश, राजकीय व दहशतवादविरोधी विश्लेषक अबू ओबैदा अरिन तसेच बांगलादेश ह्युमन राइट्स वॉच यूएसएचे संचालक शाह मोहम्मद बख्तियार हेही सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रेस क्लब्सचे अध्यक्ष डॉ. वाईल अव्वाद भूषवणार आहेत.
 
 
दरम्यान, शेख हसीना यांच्या सत्तेनंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२६ मधील सार्वत्रिक निवडणुकांनंतर संपुष्टात आला. त्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. नव्या सरकारने आवामी लीगच्या अनेक नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू ठेवली असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आवामी लीगच्या राजकीय हालचालींवरील निर्बंध कायम आहेत.