नागपूर,
Smart City Lions Club इंटरनॅशनल लायन्स क्लबच्या स्मार्ट सिटी लायन्स क्लबच्या १२ व्या पदग्रहण सोहळ्यात ॲड. मनोज साबळे यांनी २०२६-२७ वर्षासाठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सीताबर्डी येथील फॉर्च्यून मॉलच्या बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपप्रांतपाल निशिकांत प्रतापे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.नवीन कार्यकारिणीत सचिवअजय भारद्वाज, कोषाध्यक्ष, गिरीधर चौधरी,प्रशासकीय अधिकारी, संगीता साबळे,मार्केटिंग व जनसंपर्क अधिकारी शीला पवनीकरयांचा समावेश आहे. नव्या सदस्यांचे स्वागत रिजन चेअरपर्सन रविंद्र हूसुकुले यांनी केले.
कार्यक्रमात पूर्व प्रांतपाल चंद्रकांत सोनटक्के यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले, तर लॉ. प्रविण हांडा यांनी क्लबच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. नागपूर-गोवा बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्य ॲड. उमा भट्टड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. मंजुषा चव्हाण व अनुराधा सिंग यांनी केले. आभार गिरीधर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला राजे मुधोजी भोसले यांच्यासह विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:श्रीकांत पवनीकर,संपर्क मित्र