तभा वृत्तसेवा
मारेगाव,
electricity-poles-fell-down : मार्डी ते खैरी-वडकी दरम्यान उभे केलेले विजेचे खांब पुन्हा पडले आहे. आधीच जुने पडलेले विजेचे खांब उभे व्हायचे आहे. अशातच जे काही नवीन खांब उभे केलेले होते ते पुन्हा पडल्याने या कामाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वडकी ते मार्डी दरम्यान 33/11 केव्हीचे वीज जोडणीचे काम सुरू आहे. या जोडणीचे काम अशोका बिटकाण नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब उभे केले. परंतु कामाच्या कमकुवत दर्जामुळे विजेचे खांब पहिल्याच पावसात जमीन दोस्त झाले. या रोडने जवळपास 24 ते 25 विजेचे खांब पडले होते. काही खांब हे नालीच्या कडेला लागूनच उभे करण्यात आलेले आहे. तर दहा ते पंधरा खांब हे वाकलेल्या अवस्थेत आहे.
या नवीन खांब उभे करण्याच्या कामाला केवळ चार ते पाचच महिने झाले आहे हे विशेष. या कोसळलेल्या विजेच्या खांबाला उभे करण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. यापैकी काही खांब हे उभे केले. परंतु पुन्हा उभे केलेले खाब हे नुकत्याच सुरू असलेल्या पावसाने पडल्याने या कामाच्या कार्यप्रणालीवरच नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
एकदा खांब पडले हे समजू शकतात, परंतु पुन्हा नव्याने उभे केलेले खांबही पडत असतील तर कामाचा दर्जा कसा असेल यावर तर्क वितर्क लावणे सुरू आहे.
याविषयी कनिष्ठ अभियंता (ग्रामीण) निलेश काकडे यांच्याशी संबंध साधला असता त्यांनी पंचनामा सुरू आहे. एवढेचे उत्तर दिले. तर उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही उत्तर देण्यास नकार दिला.