पारवा,
theft-at-dattamath : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झटाळा फाटा येथील दत्तमठात अज्ञात चोरट्याने मंदिराचे लोखंडी गेट उघडून दानपेटी पळवून नेली. चोरट्याने मठाच्या मागील शेतात नेऊन दानपेटी फोडली व त्यातील अंदाजे 10 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
ही घटना शनिवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता उघडकीस आली. दरम्यान, मंदिरातील सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज तपासले असता, त्यात चोराचा चेहरो स्पष्टपणे दिसत आहे. पारवा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मठातील रहिवासी शहापूरी महाराज पहाटे पूजेसाठी उठले असता हा प्रकार उघडकीस आला. चोरीची माहिती मिळताच ठाणेदार हेमंत चौधरी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मठाचे सचिव राहुल भोयर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारवा पोलिसांनी भान्यासं 305(व) व 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विजय आत्राम करत आहेत.