विद्युत शॉकने दोघांचा मृत्यू

यावर्डी व रामगाव येथील घटना

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Two die of electric shock शेतकर्‍यांसाठी अत्यंत धावपळीच्या असलेल्या खरीप हंगामातच दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुयातील यावर्डी आणि रामगाव येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या विद्युत अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्डी येथील राधेश्याम रामेश्वर दातार (वय २९) हे नेहमीप्रमाणे शेतात पिकांची फवारणी करण्यासाठी गेले होते. शेतात काम सुरू असताना विद्युत खांबावरील जिवंत तार तुटून खाली पडली होती. याची कल्पना नसल्याने त्यांचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
 
 
 
er५ ४ ६
 
मात्र, डॉटरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दादगाव येथील दुर्गाबाई देवराव जाधव (वय ५५) रा. रामनगर या घरी मोटार पंप सुरू करण्यासाठी गेल्या असताना त्यांना विद्युत शॉक बसला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संबंधित प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत शेतांमध्ये विद्युत तारा, खांब, मोटार पंप व इतर विद्युत उपकरणांमुळे अपघाताचा धोका वाढतो. अनेक वेळा तुटलेल्या किंवा लोंबकळणार्‍या तारांमुळे जीवितहानी होत असल्याचे समोर येते. त्यामुळे महावितरण विभागाने शेत परिसरातील विद्युत वाहिन्यांची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावर्डी येथील घटना महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा ठपका ठेवत कुटुंबीयांनी महावितरण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.