पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
पुणे,
Virtuous death of same family पिंपरी परिसरातील मोरवाडी येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात आर्थिक संकटामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.मृतांमध्ये ५० वर्षीय विनोद पिल्लई, त्यांची ४५ वर्षीय पत्नी सिर्जा पिल्लई आणि १९ वर्षीय मुलगी पूर्णिमा पिल्लई यांचा समावेश आहे. विनोद पिल्लई यांनी आयआयएम अहमदाबाद येथे संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले होते, तर सिर्जा पिल्लई या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. तिघेही घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली. मात्र, विनोद पिल्लई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिर्जा आणि पूर्णिमा यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.
 
 
Virtuous death of same family
 
पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी जप्त केली असून त्यात कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या घटनेसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये, अशी विनंती त्यामध्ये करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासानुसार, हे कुटुंब गेल्या काही काळापासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नेहरू नगरमधील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर ते मोरवाडी परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते. या घटनेची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा सिर्जा पिल्लई या कामावर पोहोचल्या नाहीत. सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर तिघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून काही साहित्य जप्त केले असून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.