जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांत अडकले नऊशे कामगार
भारतीय अभियंते पोहोचले मदतीला, ऑक्सिजन, अन्न हेलिकॉप्टरने पोहोचवले
दिनांक :30-Aug-2026
Total Views |
काठमांडू
workers-trapped नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत आणि बचाव युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच विविध जलविद्युत प्रकल्पांमधील बोगद्यांमध्ये ९०० हून अधिक कामगार अजूनही अडकले असून, यात दीडशेहून अधिक भारतीयांचा समावेश आहे. नेपाळ सरकारच्या आवाहनानंतर भारतीय अभियंत्याचे पथक मदतीसाठी शनिवारी पोहोचले आणि नेपाळी सुरक्षा दलाच्या मदतीने कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

बचाव पथकांनी एका बोगद्यात हेलिकॉप्टरने ऑक्सिजन आणि अन्न पोहोचवले आहे, परंतु आत असलेल्या लोकांशी अद्याप संपर्क साधता आलेला नाही. त्रिशुली-३ए बोगद्यात प्रवेश करण्यासाठी सुरक्षा पथकाना एक छोटा मार्ग तयार केला आहे, मात्र भूस्खलनामुळे कामगारापर्यंत अद्याप पोहोचला आले नाही अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना आणि अभियंत्यांना वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथके ड्रिलिंग, उत्खनन आणि नियंत्रित स्फोट घडवून आणत आहेत. बचाव पथके रविवारी बोगद्याच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. या मोहिमेत सुमारे ९० सदस्यांचे एक संयुक्त पथक कार्यरत आहे. यामध्ये नेपाळ लष्कराचे ६६ जवान, प्रशिक्षित श्वानांसह एक विशेष शोध आणि बचाव पथक, सशस्त्र पोलिस दलाचे १८ जवान आणि नेपाळ पोलिसांचे जवान यांचा समावेश आहे.
अद्याप प्रतिसाद नाही
बचाव पथकाने बोगद्याच्या वरच्या भागात छोटा मार्ग तयार केला, त्यानंतर दोरीच्या साहाय्याने एक पथक बोगद्यात उतरले आणि आत असलेल्या लोकांना हाक मारली. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर, बचाव पथकाने बोगदा आणखी रुंद करण्याचे काम अधिक वेगाने सुरू केले. अधिकाऱ्यांना आशा आहे की, एकदा बोगद्याचे प्रवेशद्वार पूर्णपणे उघडले की, आत अडकलेल्या लोकांसाठी शोध आणि बचाव कार्य अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल.
खराब हवामानामुळे बचावकार्यात व्यत्ययविविध जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे ९०० हून अधिक कामगार बेपत्ता आहेत. त्यापैकी बरेच जण बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती आहे. मोठे ढिगारे, नदीचा जोरदार प्रवाह आणि खराब हवामान बचावकार्यासाठी आव्हान ठरत आहे. हेलिकॉप्टरने यंत्रसामुग्री आणि इतर मदत पोहोचवण्यात आली. मात्र शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे आणि नदीच्या वाढत्या पातळीमुळे बोगद्याजवळील उत्खनन स्थळी पाणी साचले, ज्यामुळे बचाव कार्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाला.