अथर्व तायडे विदर्भाचा कर्णधार

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |

 

नागपूर

atharva-taide केएससीए (कर्नाटक)द्वारे १ ते २८ सप्टेंबरदरम्यान बंगळुरू आणि आलूर येथे आयोजित आगामी थिम्मप्पय्या स्मृती स्पर्धेत विदर्भाच्या वरिष्ठ पुरुष संघाचे नेतृत्व ज्येष्ठ व्यावसायिक खेळाडू अथर्व तायडे याच्याकडे राहणार आहे.


atharva 
 
ही स्पर्धा चार दिवसीय सामन्यांची आहे. विदर्भाला झोन एमध्ये केएससीए-१, गोवा आणि आंध्रप्रदेश यांच्यासोबत स्थान मिळाले आहे. विदर्भ आपला सलामीचा सामना १ ते ४ सप्टेंबरदरम्यान आलूर येथे आंध्रप्रदेशविरुद्ध खेळेल. विदर्भाचे इतर गट साखळी सामने गोवा (७ ते १० सप्टेंबर) आणि केएससीए १ (१३ ते १६ सप्टेंबर) यांच्याविरुद्ध होणार आहेत. संघात अथर्व तायडे (कर्णधार), अभिषेक अग्रवाल, ध्रुव शोरे, दानिश मालेवार, यश कदम, रोहित बिनकर (यष्टिरक्षक), पार्थ रेखाडे, गणेश भोसले, प्रफुल्ल हिंगे, रजनीश गुरबानी, दर्शन नळकांडे, शिवम देशमुख (यष्टिरक्षक), शुभम कापसे, सत्यम भोयर, रोहित दत्तात्रय, प्रशिक्षक : उस्मान गनी, सहायक प्रशिक्षक सेबॅस्टियन अँटनी, व्यवस्थापक मोहम्मद साबीर, सहप्रशिक्षक युवराजसिंग दसोंधी, फिजिओ डॉ. नितीन खुराणा, साईड आर्म थ्रोअर स्वप्निल भिसीकर यांची निवड करण्यात आली आहे.