मधपेट्या रिकाम्या, प्रश्न कायम ?

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Beekeeping Project हिवरा बाजार येथील एनटीपीएस परिसरातील मधमाशी पालन प्रकल्पातील कथित अनियमिततेच्या तक्रारीनंतर KVICचे अधिकारी शेतकऱ्यांच्या दारी पोहोचले.बैठकीत काही रक्कम परत करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि प्रकल्पाच्या कारभाराचा हिशेब अद्याप बाकीच आहे.शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, दहा दिवसांचे प्रशिक्षण सांगून प्रत्यक्षात केवळ सात दिवस प्रशिक्षण देण्यात आले. तरीही दहा दिवसांचे बिल सादर केल्याचा दावा करण्यात आला. लाभार्थ्यांकडून मधपेट्या व साहित्याकरिता निर्धारित रकमेपेक्षा अधिक पैसे घेतल्याचाही आरोप करण्यात आला.
  
as
 
 
 या आरोपांवर मास्टर ट्रेनर सतीश गुढे यांनी शेतकऱ्यांची माफी मागत अतिरिक्त रक्कम व भोजन-नाश्त्याचे मिळून १८ हजार रुपये परत केले.त्यामुळे ‘पैसे परत केले म्हणजे प्रकरण संपले का?’ असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.मधपेट्यांच्या गुणवत्तेपासून मधमाशांच्या जातीपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले. Beekeeping Project पेट्या उशिरा मिळाल्या, त्यात मधमाशांची संख्या कमी होती आणि त्यानंतर आवश्यक मार्गदर्शन मिळाले नसल्याने काही महिन्यांतच पेट्या रिकाम्या झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
आता पुन्हा नवीन मधपेट्या देण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांकडून मांडण्यात आला आहे. जुन्या पेट्या निकामी का झाल्या? शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार? अतिरिक्त रक्कम का घेतली गेली? आणि प्रशिक्षणाचे बिल नेमके कशाचे? या प्रश्नांची उत्तरे आधी मिळावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.KVIC अधिकारी विजय ठाकरे यांनी सर्व तक्रारी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊन निर्णय कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र, १८ हजार रुपये परत मिळाले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात नुकसानच राहणार का? हा सवाल आता महत्त्वाचा ठरला आहे.शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करून प्रशिक्षणाचे बिल, लाभार्थ्यांकडून घेतलेली रक्कम, मधपेट्यांची गुणवत्ता आणि वितरणातील विलंब यांचा हिशेब तपासण्याची मागणी केली आहे.
सौजन्य:डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र