नागपूर,
Chhattisgarh Naxal-affected रक्षाबंधनानिमित्त जन संघर्ष समिती, नागपूरच्या वतीने छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दुर्गम पुवरती गावात सीआरपीएफ व पोलीस जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
देश आणि आदिवासी बांधवांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना समितीच्या महिला सदस्यांनी राखी बांधून त्यांच्या त्यागाला मानवंदना दिली. राखी बांधताना अनेक जवान भावूक झाले. या उपक्रमातून जवानांप्रती कृतज्ञता आणि बंधुभावाची भावना व्यक्त करण्यात आली.
सौजन्य:संकेत बांगडकर,संपर्क मित्र