बुलढाणा
fadnaviss-personal-assistan-buldhana-news मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी स्विय सहाय्यक विद्याधर महाले यांचा वाढदिवस बुलढाणा शहरात दि. १ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार असल्याने. ठिकठिकाणी शुभेच्छांचे पोस्टर बॅनर लावण्यात आले आहे. या होर्डिंग्ज वरून दि. ३० च्या मध्यरात्री वाद निर्माण होऊन धमकी व शिवीगाळ करणार्या विरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्की आव्हाड आणि सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार विद्याधर महाले मंत्रीमडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्ना बेंडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह ३० ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान एका पाढर्या चारचाकी वाहनातून तीन ते चार जण उतरले.
दुसर्या बाजूने विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे तक्रारीत आहे. तुम्ही पोस्टर कसे लावता असा जाब विचारत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यकर्ते व मजुरांना पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे करीत आहेत.