तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |


जयपूर

family-drown-in-a-pond राजस्थानच्या धौलपुर जिल्ह्यात दूज सणानिमित्त मंदिरात गेलेला एक भाऊ आणि त्याच्या तीन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूने गावात व कुटुंबात शोककळा पसरली आहे.
 
drown

आंगई पोलिस ठाणे हद्दीतील नथुआपुरा गावातील काही लोक धौंध बिरजा गावातील लोकदेवता हीरामन बाबा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आले होते. यादरम्यान, २३ वर्षीय भोलू उर्फ रवि लायक सिंह हा मंदिराशेजारील तलावात अंघोळ करण्यासाठी गेला. आंघोळ करताना तो मोबाईलवर सेल्फी घेत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो तलावाच्या खोल पाण्यात बुडू लागला. त्यावा वाचवण्यासाठी तीन बहिणींनी एकामागून एक तलावात उड्या मारल्या. परंतु, तलावाची खोली अधिक असल्याने चौघेही बाहेर येऊ शकले नाहीत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

 
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंगई व सरमथुरा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसडीआरएफ आणि स्थानिक गोताखोर यांच्या मदतीने चारही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नंदाच्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या अकल्पित दुघर्टनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे