वर्धा,
photographer rahul telrandhe wins रेवणसिद्ध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्था अमरावतीद्वारा आयोजित वेल इंडिया प्रा.लि. द्वारा प्रायोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत मध्य भारतातील प्रसिद्ध छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी पहिला क्रमाक पटकावला. प्रदर्शनीत त्यांनी लावलेल्या छायाचित्रांनी अनेकांना भुरळ पाडली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक नामांकित छायाचित्रकारांनी यात भाग घेतला होता. या स्पर्धेत प्रसिद्ध छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांचाही समावेश होता.
रिफ्लेक्शन ॲण्ड शॅडो या विषयावर तेलरांधे यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांना छायाचित्र स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. छायाचित्रकलेमध्ये अनेक स्तरांवर त्यांच्या या सातत्यपूर्ण यशस्वीतेनंतर स्थानिक प्रशासकीय स्तरावर दखल घेतल्या गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक घोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गेल इंडिया लिमिटेडचे माजी संचालक डॉ. रविकांत कोल्हे, भाजपाचे माजी प्रदेश सचिव जयंत डेहनकर, नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश चंदनपाट, मृगेंद्र मठाचे अध्यक्ष सुभाष पत्रे, रुद्र भूमी संस्थाचे अध्यक्ष सदानंद आप्पा कुर्हे प्रामुख्याने उपस्थित होते. छायाचित्रांचे परीक्षण विकास केमदेव, शशी ढवळी आणि वन्यजीव संरक्षक डॉक्टर जयंत वडतकर यांनी केले.