वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |
नागपूर, (रामटेक)
Prakash High School, Ramtek कांद्री माईन्स, रामटेक प्रकाश हायस्कूल, कांद्री माईन्स येथे रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या आकर्षक राख्या तयार करून शाळेच्या परिसरातील वृक्ष व रोपांना राख्या बांधल्या. ‘निसर्ग टिकला तरच मानव टिकेल’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
 


raksha 
 
 
यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे होते. संयोजक म्हणून कामिनी पाटील व सुचिता नागपुरे यांनी कार्य केले.
सौजन्य :प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र