मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

    दिनांक :30-Aug-2026
Total Views |

नागपूर,

salute to major dhyan chand हॉकीचे जादूगार आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नागपूर जिल्हा युनिफाइड हॉकी असोसिएशनच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच नागपूर परिसरात हॉकीच्या प्रचार-प्रसाराला चालना देतानाच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 
 
 
salute to major dhyan chand

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने युवकांमध्ये क्रीडा संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्ती रुजविण्याचा संदेश देण्यात आला. मेजर ध्यानचंद यांनी क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान आणि त्यांचे समर्पण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले कार्यक्रमाला नागपूर जिल्हा युनिफाइड हॉकी असोसिएशनचे सचिव परवेझ कुरेशी, उपाध्यक्ष शोएब परवेझ, खजिनदार अनिल दराल, संयुक्त सचिव अँड. वंदना तसेच कार्यकारिणी सदस्य फैयाज कुरेशी, राजेश बिहारी, देवेश स्वामी, कुणाल पाटील आणि जावेद राणा उपस्थित होते.