तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
guardian minister sanjay rathod बहीण-भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यवतमाळात शुक्रवारी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शेकडो भगिनी सहभागी झाल्या होत्या. उपस्थित बहिणींना मंत्री संजय राठोड यांच्यावतीने विशेष पाहुणचार करण्यात आला. या पाहुणचाराने उपस्थिती बहिणी भारावून गेल्या.
सोहळ्याची सुरुवात शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला राखी बांधून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित महिलांनी संजय राठोड तसेच शिवसेनेच्या इतर पदाधिकाèयांना राखी बांधली.
यावेळी शिवसेना पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, गजानन डोमाळे, राजुदास जाधव, यशवंत पवार, आशिष खुलसंगे, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळेकर, महेश पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रक्षाबंधनाचा सोहळा सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री राठोड व शिवसेनेच्या पदाधिकाèयांनी स्वतः पुढाकार घेत उपस्थित बहिणींच्या पंगतीत जाऊन त्यांना आदरपूर्वक भोजन वाढले. ‘आज आमच्या लाडक्या बहिणी राखी बांधण्यासाठी आमच्याकडे आल्या असून, त्यांची सेवा करण्याची आणि त्यांचा पाहुणचार करण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे. सर्व बहिणींच्या आयुष्यात सुख, समृद्ध नांदो’, अशी भावना यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली.
विशेष राख्या घेऊन महिला आघाडी मुंबईकडे रवाना
हा स्नेहाचा व उत्साहाचा सोहळा पार पडल्यानंतर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका वैशाली मासाळ, दर्शना इंगोले व ज्योती वाघाडे या महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला बांधलेल्या राख्या व काही महिलांनी तयार केलेले शेभेच्छा पोस्टकार्ड घेवून विमानाने मुंबईकडे रवाना झाल्या.guardian minister sanjay rathod मुंबईत पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून या राख्या बांधण्यात आल्या. यवतमाळ ते मुंबई असा बहिणींच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा हा धागा अनोखा रक्षाबंधन सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व तालुका महिला आघाडी प्रमुखांसह विविध महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.