तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
traffic system in pandharkawada शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत विक्रीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. हातगाडीवरून फळ विक्री करणारे विक्रेते थेट रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यातच मुख्य रस्त्यावरच भाजी विक्री केली जात असल्याने पादचाऱ्यांनाही चालण्यासाठी जागा रातत नाही.
शहरातील तहसील चौक परिसराची परिस्थिती गंभीर झाली आहे. दररोज संध्याकाळी हा परिसर भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी व्यापला जातो. त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी होते. अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेचा वापर विक्रीसाठी होत असल्याने वाहनचालक तसेच पादचाèयांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो.
यासोबतच शहरातील विविध रस्त्यांवर अल्पवयीन मुले भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसून येतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक पोलिसांकडून केवळ नावापुरती गस्त होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. आगामी काळात विविध सण-उत्सव, बाजारपेठेतील गर्दी व खरेदीसाठी वाढणारी नागरिकांची संख्या लक्षात घेता परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वेळीच नियोजन न केल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.traffic system in pandharkawada प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून भाजी व फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी, अल्पवयीनांकडून होणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी तसेच तहसील चौकासह शहरातील प्रमुख चौकांमध्ये नियमित वाहतूक नियंत्रण व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.