वणी
tiger-terror तालुक्यातील बोर्डा परिसरात वाघाचा पशुधनावर सलग हल्ला होत आहे. २४ ऑगस्टला बोर्डा शिवारात एका गाईची शिकार केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, आठच दिवसांत पशुधनावर झालेला हा दुसरा हल्ला असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वीही बोर्डा परिसरात वाघाने गाईची शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एका गाईचा बळी गेल्याने पशुधनाच्या सुरक्षेचा गंभीर निर्माण झाला आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे बोर्डा, घोन्सा आणि रासा परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व शेतमजुरांना शेतात जाणे आवश्यक असतानाच वन्यप्राण्यांच्या वावरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग पथकाने घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगल परिसरात कॅमेरे लावण्यात आले असून वनविभाग सतर्क झाला आहे. पशुधनावरील हल्ला वाघानेच केला आहे का, याबाबत वनविभाग तपास करीत आहे.