गोंदिया,
voters in gondia district भारत निवडणूक आयोगाच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार विशेष सखोल पुनरीक्षणाचा (एसआयआर) सुधारित कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप यादीत जिल्ह्यातील एकूण ११ लाख २३ हजार ८०५ मतदारांचा समावेश असून ९ लाख ६३ हजार १५९ मतदारांची नावे कायम ठेवण्यात आली असताना मृत, स्थलांतरीत, गैरहजर अशा १ लाख ६० हजार ६४६ मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सोमवारी जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. दरम्यान, जाहिर करण्यात आलेल्या यादीनुसार जिल्ह्यातील ९ लाख ६३ हजार १५९ मतदारांची (८५.७१ टक्के) नोंद कायम आहे. त्यातच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या गृहभेटीच्या वेळी मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, गैरहजर अथवा सापडू न शकलेले तसेच दुबार किंवा अन्य ठिकाणी नोंदणी असलेले असे १ लाख ६० हजार ६४६ (१४.२९ टक्के) मतदार आढळून आले आहेत. अशा मतदारांची स्वतंत्र यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दावे-हरकतीसाठी महिनाभराची मुदत
प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांना ३० सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे दावे-हरकती दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.voters in gondia district त्यामुळे नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून आवश्यक ती कार्यवाही मुदतीत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार...
मतदारसंघ मतदार टक्केवारी
६३-अर्जुनी मोरगाव २ लाख २९ हजार ८८२ ८८.७१ टक्के
६४-तिरोडा २ लाख २२ हजार ५५३ ८३.०८ टक्के
६५-गोंदिया २ लाख ६८ हजार २३७ ८२.२९ टक्के
६६-आमगाव २ लाख ४२ हजार ४८७ ८९.५४ टक्के