
केंद्र सरकारच्या १०० टक्के साक्षर भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निरक्षर प्रौढांची नोंदणी करून त्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. मार्च महिन्यात या प्रौढांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत वाचन, लेखन व संख्याज्ञान या तीन घटकांवर आधारित एकूण १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली.
जिल्ह्यातील ९९१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला ५ हजार २२५ प्रौढ बसले होते. त्यापैकी ५ हजार २१३ प्रौढ उत्तीर्ण झाले, तर केवळ १२ जण अनुत्तीर्ण झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात शिक्षणाची नवी सुरुवात करणाऱ्या या ज्येष्ठांच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.आर्णी - २०७
बाभूळगाव - १४५दारव्हा - ८७५
दिग्रस - ११०घाटंजी - २८८
कळंब - १६६महागाव - २९९
मारेगाव - ३०५नेर - ७६५
पांढरकवडा - २७०पुसद - ५८३
राळेगाव - १२८उमरखेड - ४१
वणी - ४३३यवतमाळ - ५८०
झरी - ३८