अन् मदतीऐवजी तिला एकटी सोडून त्याने काढला पळ!

- प्रकृती खालावल्याने २१ वर्षीय युवतीचा मृत्यू, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
गोंदिया,
gondia news प्रेमसंबंध असलेल्या तरुणीची अचानक प्रकृती खालावल्यानंतर तिला वैद्यकीय मदत मिळवून देण्याऐवजी घटनास्थळी एकटे सोडून एका युवकाने पलायन केल्याचा प्रकार तालुक्यातील सावकारटोली बसस्थानक परिसरात रविवार ३० ऑगस्ट रोजी घडला. या घटनेत सदर युवतीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. नंदिनी प्रेमसिंग चौहान रा. धामणगाव असे त्या दुर्दैवी तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी संबंधित युवक जागेश्वर ऊर्फ सोनू हेमराज पटले (२९), रा. धामणगाव, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
 
gondia news
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि जागेश्वर यांच्यात प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघेही सावकारटोली परिसरात एकत्र होते. याचदरम्यान अचानक नंदिनीची प्रकृती अत्यंत खालावली. तिला भोवळ येत होती. तसेच तिला वाहनात बसणे आणि व्यवस्थित बोलणेही शक्य होत नव्हते. प्रकृती अत्यंत गंभीर होत असतानाही तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी जागेश्वरने तिला तेथेच सोडून निघून गेला. विशेष म्हणजे, नंदिनीने विश्वासाने आपला मोबाइल फोन त्याच्याकडे ठेवायला दिला होता. तिचा मोबाइल स्वतःकडे असतानाही त्याने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली नाही. उलट घरच्यांना माहिती देण्याची कृती करून घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, नंदिनीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली.gondia news मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संकटाच्या प्रसंगी मदतीचा हात देण्याऐवजी तिला एकटे का सोडण्यात आले, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वर्षा नेताम यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी जागेश्वर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र भोसले तपास करीत आहेत.