अकोल्यातील नया जीन परिसरात दरोडा!

हातपाय बांधून ५० लाखांचे दागिने अन् ४ लाखांची रोकड लंपास केल्याचा व्यावसायिकाचा आरोप

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
अकोला,
dacoity in akolas शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या दरोड्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मोहता मिल मार्गावर असलेल्या विजय गुप्ता यांच्या गुप्ता ऑइल मिल आणि त्याच इमारतीत असलेल्या त्यांच्या घरात तीन जणांनी प्रवेश करून विजय गुप्ता मारहाण केली, त्यांचे हातपाय बांधून त्यांना खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर घरातील तिजोरीतून सुमारे ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख घेऊन आरोपी पसार झाल्याची माहिती गुप्ता यांनी घटनेनंतर दिली .घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, एलसीबीची चमू, फॉरेन्सिक व्हॅन आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.
 
 
 
dacoity in akolas
 
 
विजय गुप्ता हे नया जीन येथे राहतात. त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर 'गुप्ता ऑइल इंडस्ट्रीज' नावाने त्यांचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देण्यासाठी घरून खाली ऑइल मिलमधे आले होते. याच वेळी तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले आणि एका खोलीत कोंडून ठेवल्याचे विजय गुप्ता यांनी माध्यमांना सांगितले. दरोडेखोरांनी घरातील तिजोरीतून अंदाजे २ लाख ५० हजार रुपये तसेच त्यांच्या पत्नीचे अंदाजे १ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ४ लाख रुपयांची रोकड सोबत अंदाजे ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत आणि स्वरूप पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेत मागील चार ते पाच वर्षांपासून गुप्ता यांच्या घरी हमाल म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीवर संशय असून पोलिस त्या दृष्टीने देखील तपास करीत आहेत. दरम्यान गत काही दिवसांपासून संशयित व्यक्ती एका नवीन साथीदारासोबत येत असल्याचीही चर्चा आहे.dacoity in akolas घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून घटनास्थळ तसेच परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी सुरु आहे. तपासासाठी विविध पथकांचे गठन देखील करण्यात आले आहे.