दिल्ली हादरली! विवेक विहारमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट

पती-पत्नी ६० टक्के भाजले, पश्चिम दिल्लीत लाकडाच्या कारखान्यालाही भीषण आग

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi fire accident दिल्लीतील विवेक विहार परिसरात झोपडीत ठेवलेल्या छोट्या एलपीजी सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. विवेक विहार पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या झोपडी क्रमांक ११ मध्ये हा स्फोट झाला. या दुर्घटनेत ३५ वर्षीय अनिल दास आणि त्यांची ३० वर्षीय पत्नी खुशबू हे गंभीररीत्या भाजले आहेत. दोघेही सुमारे ६० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

delhi fire accident lpg cylinder blast in vivek vihar, couple 60% burnt; timber factory fire in west delhi 
झोपडीत ठेवलेल्या छोट्या एलपीजी सिलिंडरमध्ये अचानक स्फोट झाला. जोरदार आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर पीसीआरच्या मदतीने अनिल दास आणि खुशबू यांना तातडीने राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन वॉटर टेंडर आणि एका वॉटर बॉजर युनिटला घटनास्थळी पाठवण्यात आले. दरम्यान, एलपीजी सिलिंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण आणि गोंधळाचे वातावरण होते.दरम्यान, पश्चिम दिल्लीतील राजधानी मेट्रो स्थानकाजवळ रविवारी पहाटे लाकूड आणि प्लायवूडच्या कारखान्यात भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवेने तब्बल २५ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.असम टिंबर मार्केटमधील लाकडाच्या गोदामाला पहाटे सुमारे तीन वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. सुरुवातीला नऊ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर परिस्थितीची तीव्रता  delhi fire accident लक्षात घेऊन आणखी अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली. पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी आग भीषण असल्याचे घोषित करण्यात आले.
सुमारे २,००० चौरस गज क्षेत्रफळात पसरलेल्या या इमारतीच्या तळघरात लाकडाचे गोदाम होते. इमारतीमध्ये तळघर, भूतलावरील स्टिल्ट भाग आणि दोन मजले आहेत. या गोदामात लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास प्रयत्न केले. अखेर सकाळी साडेसहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.