नाल्या सफाईचा खर्च १२ वरून ४६ हजारांवर!

ग्रामसभेत प्रश्नांची सरबत्ती *नांदोरा येथील ग्रामसभा ठरली वादळी

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |
देवळी,
drain cleaning cost नांदोरा (डफरे) येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विविध विकासकामं व घरकुल योजनेतील अनियमिततेवरून सरपंच नयना गायकवाड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे, गावातील नालेसफाईच्या खर्चाचा मुद्दा ग्रामसभेत चांगलाच गाजला. नाल्या सफाईचा खर्च वर्षभरात १२ हजारांवरून ४६ हजारांवर करण्यात आल्याने ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
 
 
drain cleaning cost
 
 
गेल्या वर्षी गावातील नालेसफाईचे काम १२ हजार रुपयांत करण्यात आले होते. मात्र, यावर्षी त्याच कामासाठी तब्बल ४६ हजार रुपयांचा खर्च कसा झाला असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. अल्पावधीत नालेसफाईच्या खर्चात एवढी मोठी वाढ का झाली, कामाचा खर्च कशाच्या आधारावर ठरविण्यात आला, याबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला. मात्र, या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल वाटपावरूनही ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. एकाच कुटुंबातील पात्र व्यक्तींना दुहेरी लाभ देण्यात आल्याचा तर खर्या गरजू लाभाथ्र्यांना डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
गावातील तब्बल ५२ नागरिकांनी घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज केले असताना केवळ निवडक २० जणांनाच घरकूल मंजूर करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला. उर्वरित पात्र अर्जदारांना घरकुलाचा लाभ का मिळाला नाही, लाभार्थी निवडीचे निकष काय होते, याबाबत ग्रामस्थांनी सरपंचांसमोर प्रश्न उपस्थित केले.
मात्र, या प्रश्नांवर मला माहिती नाही, मी गावात नव्हती असे उत्तर देताच सरपंच गैरहजर असलेल्या कालावधीत ग्रामपंचायतचा कारभार कोण पाहत होते किंवा ग्रामपंचायत वार्यावर होती का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. सरपंच्याच्या या उत्तराने ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.drain cleaning cost ग्रामसभेतील चर्चेमुळे गावातील विकासकामं, खर्च आणि घरकुल लाभार्थी निवड प्रक्रियेची पारदर्शकता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष देऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.