मानोरा,
manora news पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या मौजे गव्हा येथील शेतकरी कमल गणेश चव्हाण यांना पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत बिट जमादार मदन पुणेवार सह २ पोलिस कर्मचार्यांनी मारहाण करून ९ हजार रुपये लुटल्याची तक्रार पोलिस अधीक्षक निकेश खटमोडे पाटील यांच्याकडे पाठवली आहे.
पोलिस अधीक्षक यांचेकडे पाठविलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्ता कमल चव्हाण हे दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी गव्हा गावात मजूर पाहण्यासाठी गेले असता, बिट जमादार मदन पुणेवार व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी मनीष अगलदरे व शंकर राख हे पांढर्या रंगाच्या खाजगी कार घेऊन सिव्हिल ड्रेसमध्ये मौजे गव्हा गावात आले. त्यांनी मला रस्त्यात अडवून शिवीगाळ, मारहाण केली व तू जुगार खेळत होता काय, असे सांगितले, मी मजूर पाहण्यासाठी आलो आहे. असे म्हटले असता त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व खिशातील ९ हजार रुपये रोख रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल फोन काढून घेतला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे माझ्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.manora news जिल्हा रुग्णालय वाशीम येथे तपासणी केली असता डाव्या कानाचा पडदा फाटल्याचे डॉटरांनी सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच चोरी केलेली रक्कम व मोबाईल परत मिळवून द्यावा, अशी मागणी कमल चव्हाण यांनी पोलिस अधिक्षक यांचेकडे केली आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीविरुद्ध कडक कार्यवाही न्याय करून द्यावा, अशी मागणी तक्रारकर्त्याने पाठविले आहे.